esakal | मित्राचाच गळा चिरणारा आरोपी चोवीस तासात जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

Murderer Arrested

मित्राचाच गळा चिरणारा आरोपी चोवीस तासात जेरबंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव - किरकोळ वादातून मित्राचा (Friend) सुरीने गळा चिरून अतिशय निर्घृणपणे खून (Murder) करून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोवीस तासात जेरबंद (Arrested) केले. ही घटना ११ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास खेड तालुक्यातील पाईट ते शिरोली रस्त्यावर घडली होती. अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिली.

रमजान शेख याचा खून केल्याप्रकरणी त्याचा मित्र रफिक उस्मान शेख (मुलाणी) (वय ३५ वर्ष, रा. अहिरे ता. खेड) याला आज वडगाव मावळ येथे अटक केली.

हेही वाचा: एसटी बसमध्ये जागा पकडण्याची शक्कल महिलेच्या आली अंगलट

याबाबत माहीती अशी, ११ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास रमजान शेख, रफिक शेख हे मित्र चंद्रकांत सुदाम शिवले (राहणार किवळे. ता. खेड) यांच्या मोटारसायकल वरून ट्रिपलसीट पाईट - शिरोली रोडने जात होते. दरम्यान, हॉटेल मध्ये झालेल्या किरकोळ वादातून रफिक शेख (मुलाणी) याने रमजान शेख याचा गळ्यावर धारधार हत्याराने वार करून खून केला. त्यानंतर रफिक शेख (मुलाणी) फरार झाला होता. याबाबतची फिर्याद चंद्रकांत शिवले यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली होती.

हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा उघडकीस आणून आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखा पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीच्या मागावर असताना फरार आरोपी रफिक शेख (मुलाणी) हा वडगाव मावळ फाट्यावर येणार असल्याची खात्रीशीर माहिती एका बातमीदारामार्फत मिळाली होती. आज दुपारी आरोपीला सापळा रचून वडगाव मावळ येथे अटक केली. आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. पुढील तपासासाठी आरोपीला खेड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्यातील आरोपीला पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधीकारी लंभाते यांचे मागदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, फौजदार रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार प्रकाश वाघमारे, हवालदार दिपक साबळे, सूर्यकांत वाणी, विक्रम तापकिर, योगेश नागरगोजे, संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर यांच्या पथकाने अटक केली.

loading image
go to top