येरवड्यातील कैद्यांवर होतायत 'संगीतोपचार' (व्हिडिओ)

Music Therapy for prisoners in Yerwada Jail
Music Therapy for prisoners in Yerwada Jail

येरवडा: ‘सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृहाचे ब्रीदवाक्य आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना सुधारण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून संगीतोपचाराचा वेगळा प्रयोग राबविला जात आहे. आतापर्यंत प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन, प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, सुरेश वाडकर, जगप्रसिद्ध ड्रमवादक व तालयोगी शिवमणी यांनी सादर केलेल्या वादन व गायनामुळे कैद्यांमध्ये चांगले जीवन जगण्याचा आत्मविश्‍वास निर्माण झाला आहे. 

राज्य कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान व आदर्श मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गेली तीन वर्षांपासून प्रेरणापथ या उपक्रम अंतर्गत प्रसिद्ध गायक व संगीतकारांचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये उस्ताद जाकीर हुसेन यांच्या तबला वादनामुळे कैदी मंत्रमुग्ध झाले होती. तर ड्रमवादक व तालयोगी शिवमणी यांनी वादन कलेची प्रत्यक्षात अनुभुती कैद्यांनी घेतली. कारागृहातील कैद्यांसमोरील सादरीकरणाने त्यांच्यामध्ये संगीताच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे भाग्य लाभले. या ऊर्जेच्या अनुभूतीने हे कैदी भविष्यात पुन्हा गुन्हेगारीकडे न वळता सकारात्मक काम करतील असा विश्वास शिवमणी यांनी व्यक्त केला. 

शंकर महादेव सादर केलेल्या गाण्यांवर कैद्यांनी नृत्याचा ठेका धरला होता. तर सुरेश वाडकर यांनी गायलेल्या ‘प्रेमगितांवर’ कैद्यांनी शिट्टा वाजवून प्रतिसाद दिला. 

प्रसिद्ध गायक व वादकांनी सादर केलेल्या कार्यक्रमामुळे आपण वाईक नसल्याची भावना कैद्यांमध्ये जागृत झाली आहे. कारागृहातील संगिताेपचाराचा हा वेगळा प्रयोग ठरला आहे. त्यामुळे कैद्यांमध्ये सकारात्मक मानसिकता तयार झाली असून ते कारागृहाच्या बाहेर पडल्यानंतर त्यांना नक्की मदत होईल, असा विश्‍वास आहे.
- डॉ. मिलिंद भोई, समन्वयक, प्रेरणापथ 

प्रेरणापथ प्रकल्प कैद्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून मैलाचा दगड ठरला आहे. प्रशासन व स्वयंसेवी संस्था एकत्र आल्यानंतर काय घडू शकते याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.
- विठ्ठल जाधव, विशेष पोलिस महानिरीक्षक, कारागृह विभाग

कारागृहात आल्यानंतर मनात सुडाची व रागाची भावना निर्माण झाली होती. प्रेरणापथ प्रकल्प अंतर्गत जाकिर हुसेन, शंकर महादेवन, शिवमणी, सुरेश वाडकर यांच्या सोबत गाण्याची सुवर्णसंधी मिळाली. हा आयुष्यात खरा प्रेरणापथ ठरला आहे.
- नितिन आरोळे, कारागृहातून मुक्त झालेला बंदी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com