

Ramzan Iftar mob attack Pune
ESakal
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इफ्तारची तयारी करणाऱ्या तरुणांवर जमावाकडून हल्ला करण्यात आला आहे. या मॉब लिंचिंग प्रकरणात पाच जण जखमी झाले आहेत. तर या घटनेत अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलीस कसून तपास करत आहेत. तर या गंभीर घटनेचा घटनक्रम समोर आला आहे. यामुळे आता पुण्यात खळबळ उडाली आहे.