पुण्यात वातावरण तापलं, राज ठाकरेंच्या नावाला फासलं काळं

Raj thackeray
Raj thackeray

पुण्याच्या कोंढव्यातील नुरानी कब्रस्तानचा भूमिपूजनाचा कार्यक्रम राज ठाकरे यांच्या हस्ते झाला होता. राज ठाकरे यांच्या नावाला काळा रंग लावून स्थानिक लोकांनी त्यांचा निषेध दर्शवला आहे.

गुढीपाडवा मेळाव्यात शिवतीर्थावरील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून मुस्लीम बांधवांमध्ये नाराजी असल्याचं समोर आलंय.

या बांधवांच्या भावना दुखावल्याने पुण्यात याधीच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर दुसरीकडे पुण्यात मनसेने पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चार दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. चार दिवसात भोंगे न काढल्यास पुण्यात दुप्पट भोंगे लवून हनुमान चालिसा म्हणणार असल्याचं स्पष्ट केलंय.

Raj thackeray
पुण्यात मनसेला दुसरा धक्का, आणखी एका पदाधिकाऱ्याचा राजीनामा
Raj thackeray
मला प्रभागात शांतता हवीय, मनसे पुणे शहराध्यक्षांनी धुडकावला राज ठाकरेंचा आदेश

दरम्यान, पुण्यात मुस्लीम बांधवांनी राज ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या कब्रस्तानावर असलेलं राज ठाकरे यांच्या नावाना काळा रंग लावला. राज ठाकरे यांच्या निर्णयाचा निषेध त्यांनी नोंदवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com