अतिक्रमण, मातीउपशामुळे कालवा फुटल्याची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

पुणे - खडकवासला धरणातील पाणी शेती व पिण्यासाठी सोडण्याकरिता १८७५ साली यवतपर्यंत जुना कालवा होता; त्यानंतर इंदापूरपर्यंत पाणी नेण्यासाठी १९९० मध्ये नव्याने कालवा बांधण्यात आला होता; परंतु शहरातून जाणाऱ्या २८ किलोमीटर कालव्याच्या दुतर्फा अतिक्रमणे, महापालिकेकडून जलवाहिनी आणि विद्युतवाहिन्या टाकण्यासाठी केलेली खोदाई आणि स्थानिक नागरिकांकडून घरगुती वापरासाठी होणारा मातीउपसा यामुळे कालवा फुटल्याची शक्‍यता जलसंपदा विभागाचे माजी सचिव सुरेश शिर्के यांनी ‘सकाळ’शी बोलताना वर्तविली. 

ब्रिटिशांच्या काळात १८७५ साली खडकवासला धरणाचे नियोजन दुष्काळनिवारण आणि शेतीच्या पाण्यासाठी करण्यात आले होते. त्यानंतर वरसगाव, पानशेत आणि टेमघर या धरणांचे पाणी खडकवासला धरणात साठवून पुढे ते पाणी कालव्याद्वारे शेतीसाठी आणि त्यातून शिल्लक राहिले, तर पिण्यासाठी असे नियोजन होते. १९९३ मध्ये तत्कालीन पाटबंधारे विभाग आणि आताच्या जलसंपदा विभागाकडून पिण्याच्या पाण्यासाठी करार करण्यात आला. त्यानुसार शहराला ११.५ टीएमसी पाणी पिण्यासाठी देण्याचा करार झाला. प्रत्यक्षात १८ टीएमसी पाणी उचलले जाते. त्यापैकी साडेसहा टीएमसी पाण्यावर प्रक्रिया करून शेतीसाठी देणे अपेक्षित आहे; परंतु तसे होत नाही. 

कालव्याच्या दुतर्फा २५० फुटांपर्यंत जलसंपदा विभागाची जमीन आहे. त्यावर अतिक्रमण, मातीमध्ये जलवाहिनी आणि विद्युतवाहिन्यांसाठी खोदाईमुळे हा अनर्थ ओढावला.
- सुरेश शिर्के, माजी सचिव, जलसंपदा विभाग

Web Title: Mutha canal wall broken because Encroachment due to soil deprivation