esakal | नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी 'माझे संकलन, माझी जबाबदारी' मोहीम
sakal

बोलून बातमी शोधा

Dr-Rajesh-Deshmukh

कोरोना आपत्ती निवारणाच्या कामासोबतच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नागरिकांची कामे मार्गी लावावीत. त्यासाठी "माझे संकलन, माझी जबाबदारी' मोहीम राबविण्यात येत आहे. विकासकामे आणि सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी व्यक्त केला.

नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी 'माझे संकलन, माझी जबाबदारी' मोहीम

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना आपत्ती निवारणाच्या कामासोबतच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नागरिकांची कामे मार्गी लावावीत. त्यासाठी "माझे संकलन, माझी जबाबदारी' मोहीम राबविण्यात येत आहे. विकासकामे आणि सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात या मोहिमे अंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. देशमुख बोलत होते. अतिरिक्‍त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी या वेळी उपस्थित होते.

हाजीर हो! बडतर्फ पोलिस जगतापसह चौघांना कोर्टाचे आदेश

डॉ. देशमुख म्हणाले, कोरोना संसर्ग कालावधीत प्रशासन उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे नागरिकांची कामे प्रलंबित राहू नयेत, यासाठी "माझे संकलन, माझी जबाबदारी' मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमे अंतर्गत प्रलंबित कामे गतीने मार्गी लावावीत. तसेच, कार्यालयीन कामकाजात सकारात्मकता ठेवून गुणवत्तापूर्ण काम करण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न महत्त्वाचा ठरणार आहे. झिरो पेंडन्सी अभियानाच्या माध्यमातून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात आदर्श निर्माण केला आहे. प्रत्येकाने कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करावा. 

बारामतीत प्रथमच प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग; रुग्णाचे प्राण वाचविण्यास यश

अतिरिक्‍त जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले, प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी ही मोहीम उपयुक्‍त ठरणार आहे. या वेळी त्यांनी प्रशिक्षण, कार्यक्षमता, अभिलेख कक्ष अद्ययावत करणे, कालबाह्य अभिलेख, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आढावा, सहा गठ्ठा पदधती, टपालावरील प्रक्रिया, टिपणी सादर करण्याची पद्धती याबाबत मार्गदर्शन केले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. कटारे यांनी आभार मानले. या प्रशिक्षणास जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय प्रांत अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Edited By - Prashant Patil