माझे शिक्षण, माझा अधिकार : पुणे जिल्ह्यात मुलींच्या शिक्षणासाठी मोहिमेची सुरवात

माझे शिक्षण, माझा अधिकार : पुणे जिल्ह्यात मुलींच्या शिक्षणासाठी मोहिमेची सुरवात

पुणे - आर्थिक चणचणीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने या मुलींसाठी "माझे शिक्षण, माझा अधिकार ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेची सुरवात आंतरराष्ट्रीय कन्या दिनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली. या मोहिमेच्या उद्‌घाटनाच्यानिमित्ताने जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन दानशूर व्यक्ती, संस्था आणि संघटनांना केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी कन्यादिनी आकाशवाणीवरून हे आवाहन केले आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूजा पारगे आणि या विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे, डॉ. रत्नप्रभा पोतदार आदी यावेळी उपस्थित होते.

पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गावां-गावात माझे शिक्षण, माझा अधिकार या मोहिमेबाबत जनजागृती करण्यात आली. यानिमित्ताने जिल्ह्यातील गावां-गावात नव्याने लग्न झालेल्या कुटुंबांच्या घराच्या दारावर बेटी बचाओ बेटी पढाओ स्टिकर चिकटविण्यात आले. याशिवाय बालिका दिनी जन्माला आलेल्या बालिकांना आरोग्य किटचे वाटप करण्यात आले.

मुलींना शिक्षण, आरोग्य, पोषण आणि कायदेशीर अधिकार मिळावेत, यासाठी 2012 पासून आंतरराष्ट्रीय कन्या दिन साजरा करण्यात येत आहे. यानुसार जगभरात दरवर्षी 11 ऑक्‍टोबरला हा कन्या दिन साजरा करण्यात येतो.त्यानुसार काल (रविवारी) नववा आंतरराष्ट्रीय कन्या दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पुणे जिल्ह्यातील दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या मुलींचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात सुमारे साडेपाच हजार मुलींनी केवळ आर्थिक कुवतीअभावी इच्छा असूनही पुढील शिक्षण घेता येत नसल्याचे सांगितले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com