पुण्यातील धनकवडी परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या अभियानाचा प्रारंभ कोंढवा- येवलेवाडी प्रभाग समिती अध्यक्षा मनीषा कदम यांच्या हस्ते करण्यात आला.

धनकवडी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यात आणि पुणे शहरात राज्य सरकारने सुरू केलेल्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या अभियाांतर्गत १५ सप्टेंबरपासून राज्यातील महानगरपालिका लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शासकीय यंत्रणा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या मोहिमेत शासकीय कर्मचारी, महसूल, आरोग्य सेवक पथक प्रभागातील प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन कुटुंबातील प्रत्येकाची कोरोना संदर्भात आरोग्य तपासणी करणार आहेत.या अभियानाचा शुभारंभ कोंढवा- येवलेवाडी प्रभाग समिती अध्यक्षा मनीषा कदम यांच्या हस्ते करण्यात आला.

या उपक्रमाच्या प्रारंभप्रसंगी माजी महापौर व नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, नगरसेविका राणी भोसले, महानगरपालिका सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, वैदयकीय अधिकारी अमोल साळुंखे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास  माने,  उपआरोग्य निरीक्षक ए. पी. मंद्रुपकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, ही मोहीम (ता. 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर) अशी होणार आहे. कोविडवर नियंत्रण मिळविण्यासाठी व मृत्यू दर कमी करण्यासाठी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' याअंतर्गत कोविड मुक्त पुणे अशी ही मोहीम राबविण्यात  येणार आहे.

हे वाचा - पुण्याचा चिराग फलोर "जेईई'मध्ये देशात बारावा; दिल्ली एनसीटीमध्ये प्रथम

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि अनलॉकमध्ये नागरिकांनी कामानिमित्त बाहेर पडताना सोशल डिस्टन्स आणि मास्कचा वापर करावा. आदी विषयावर प्रबोधन केले जाणार आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: my family is my responsibility campaign started in dhankawadi area