मांजरी येथे मुळा मुठावरील पुलाच्या कामाला नाबार्डचा निधी

मांजरी येथे मुळा मुठावरील पुलाच्या कामाला नाबार्डचा निधी

मांजरी- सोलापूर-नगर महामार्गाला जोडणाऱ्या मांजरी येथील मुळा–मुठा नदीवरील पुलासाठी नाबार्डकडून निधी मंजूर झाला आहे. येत्या सहा महीन्यात या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार योगेश टिळेकर यांनी दिली.

आमदार टिळेकर यांनी नदीवरील सध्याच्या सबमर्सिबल पुलाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. भाजपचे पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, मांजरी बुद्रूक व मांजरी खुर्दचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 

येथील मुळा-मुठा नदीवरील सध्याच्या पुलामुळे मांजरी-वाघोली रस्त्यावरील वाहतूक गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केवळ हलकी वाहने नाही तर अवजड वाहनेही या मार्गावरून धावत आहेत. शेतकरी, विद्यार्थी, कामगार यांच्यासाठी हा पूल वरदान ठरला आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणातील वाहतुकीला हा सबमर्सिबल पूल न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे प्रवासी व स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी संपूर्ण वाहतुकीसाठीच्या सक्षम पुलाची मागणी केली होती. या भागात वाढत असलेले नागरिकरण व सर्वप्रकारच्या वाहतुकीमुळे दिवसेंदिवस त्याची गरजही येथे भासू लागली आहे. ही गरज लक्षात घेऊन या ठिकाणी सरकारने सक्षम पूल उभारण्याच्या कामाला मंजुरी दिली आहे. 

आमदार टिळेकर म्हणाले, "या पुलाच्या कामासाठी नाबार्डकडून २३ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेली आहे. राज्य सरकारच्या २०१९ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या निधीचा समावेश होईल. मांजरी स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल व मुळा-मुठा नदीवरील पूल झाल्यानंतर या जिल्हामार्गावरील दळणवळणाला मोठ्या प्रमाणात गती मिळेल. या दोन्हीही पुलांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी पाठपुरावा केला जाईल.'                      
                                                           

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com