नगर-कल्याण महामार्ग खचला

पराग जगताप
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

नगर-कल्याण महामार्ग करंजाळे (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत चीर पडून खचू लागला होता. तो शुक्रवारी पाच फूट खचला. पडलेली चीर शंभर फुटांपेक्षा जास्त लांबीची आहे.

ओतूर (पुणे) : नगर-कल्याण महामार्ग करंजाळे (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत चीर पडून खचू लागला होता. तो शुक्रवारी पाच फूट खचला. पडलेली चीर शंभर फुटांपेक्षा जास्त लांबीची आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्गाच्या नारायणगाव विभागाचे उपअभियंत्या सी. व्ही. चव्हाण व शाखा अभियंते जयंत कचरे यांनी सांगितले की, करंजाळे येथे खचलेल्या महामार्गाची पाहणी केली आहे. येथे डागडुजीसाठी मशिनरीचा उपयोग करावा लागणार आहे. त्याबाबत त्वरित कार्यवाही केली जाणार आहे. तसेच या ठिकाणाहून जड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी करून फक्त हलक्‍या व स्थानिक वाहनांनाच परवानगी द्यावी, अशी शिफारस केली आहे. करंजाळे येथे खचलेल्या महामार्गाच्या ठिकाणी अपघाताची शक्‍यता पाहता ओतूर पोलिसांकडून बॅरीगेट लावण्यात आले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagar-Klyan Highway