मॉरिशसमध्ये मराठी भाषिकांनी साजरा केला नागपंचमीचा सण

मिलिंद संधान
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

नवी सांगवी (पुणे) - मॉरिशस मराठी मंडळ फेडरेशन, कला व संस्कृती मंत्रालयाखाली संलग्न असलेले मराठी कल्चरल सेंटर व मराठी स्पिकिंग युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने मॉरिशसमध्ये नागपंचमी सण उत्साहात साजरा करण्यात आला.

मराठी धार्मिक सभेच्या मंदिरात पंडित रुपाजी गणू यांच्या हस्ते नागोबाच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित भक्त मंडळींनी भजन गात नागोबाची मुर्ती जवळील नदीत विसर्जीत केली. न्यू ग्रोव या गावात मराठी मित्र मंडळाच्या वतीने भजन, कीर्तन व प्रवचन आयोजित केले होते. यावेळी मराठी भाषिकांनी मोठी गर्दी केली होती. रोजबेल येथील श्री गजानन आश्रमातही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन नागपंचमी सण साजरा झाला.  

मराठी कल्चरल सेंटर ट्रस्टचे अध्यक्ष अर्जुन पुतलाजी म्हणाले, "मॉरीशस हा बिन सापांचा देश आहे. तरीही मराठी लोकांनी नागपंचमी सण उत्साहात साजरा केला. येथे या सणा विषयी माहिती व त्याचे महत्व स्थानिक रेडिओवरुन प्रसारीत करण्यात येते. फेडरेशनचे अध्यक्ष आसंत गोविंद व युनियनचे अध्यक्ष डाँ बीदन बाबा यांचे सहकार्य लाभले".

Web Title: Nagpanchami festival was celebrated by Marathi speakers in Mauritius