कासारवाडीत महिलांसाठी नागपंचमी निमित्त महोत्सव

रमेश मोरे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

जुनी सांगवी - सध्याच्या धकाधकीच्या काळात सण उत्सव व त्यातील आनंद साजरा करण्यासाठी वेळ मिळत नाही. यामुळे पुर्वी सण उत्सवा दरम्यान खेळले जाणारे पारंपारिक खेळ, त्यातुन मिळणारा आनंद सध्या दुर्मिळ होत चालला आहे. नागपंचमीच्या सणानिमित्त कासारवाडी येथे पारंपारिक खेळा सोबत महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

जुनी सांगवी - सध्याच्या धकाधकीच्या काळात सण उत्सव व त्यातील आनंद साजरा करण्यासाठी वेळ मिळत नाही. यामुळे पुर्वी सण उत्सवा दरम्यान खेळले जाणारे पारंपारिक खेळ, त्यातुन मिळणारा आनंद सध्या दुर्मिळ होत चालला आहे. नागपंचमीच्या सणानिमित्त कासारवाडी येथे पारंपारिक खेळा सोबत महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार ता.११ ते रविवार ता.१२ दुपारी ३ ते ५ या वेळेत शास्त्रीनगर भाजी मंडई व सितांगन उद्यानासमोर येथे मेहंदी स्पर्धा, पारंपारिक खेळ, फुगडी, उखाणे, सुंदर पारंपारिक वेशभुषा ईत्यादी स्पर्धांचे येथील आदित्य बहुउद्देशीय संस्था व नगरसेविका आशा धायगुडे (शेंडगे) यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. 

मेहंदी स्पर्धेसाठी प्रथम बक्षिस २२२२रु., दुस-या क्रमांकासाठी १५५५ रू.तर तिस-या क्रमांकासाठी ११११रू.रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. या महोत्सवासाठी प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.अश्विनी जगताप, माजी स्थायी अध्यक्षा सिमा सावळे या उपस्थित राहणार आहेत. महोत्सवादरम्यान उत्कृष्ट पारंपारिक वेशभुषा करणा-या महिलांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रभागातील महिला बचत गट, महिला मंडळ महोत्सवाचे संयोजन करणार आहेत.

Web Title: nagpanchami mohatsav in kasarwadi pune