नेल आर्टचे तरुणाईला वेड

Nail-Art
Nail-Art

पुणे - मेकअप, हेअर स्टाईल, चप्पल आणि हटके कपड्यांनंतर आता युवा पिढीमध्ये नेल आर्टचा ट्रेंड आला आहे. या ट्रेंडने महिलांच्या महिन्याच्या बजेटमध्ये स्थान मिळवले आहे. नखे रंगविण्याच्या या ट्रेंडसाठी सध्या महिला महिना तीन हजारांपेक्षा जास्त तरतूद करत आहेत. ‘नेल आर्ट’ करण्याचा खर्च ८०० रुपयांपासून पाच हजारांपर्यंत असतो.   सौंदर्य प्रसाधने, कपडे, अशा अनेकविध साधनांनी महिला कायम ट्रेंडिंगमध्ये असतात. शरिराच्या प्रत्येक भागाला सौंदर्याचा स्पर्श व्हावा यासाठी स्त्रिया अत्यंत जागरूक असतात. यात आता नखे सुंदर दिसण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने सजविण्याकडे कल वाढत आहे. नोकरदार, उद्योजिका असो वा विद्यार्थिनी सध्या ‘नेल आर्ट’च्या ट्रेंडमध्ये दिसत आहेत. लग्न सोहळा असो वा कॉलेज फेस्टिव्हल, रिसेप्शन असो वा वाढदिवस अशा प्रसंगांसाठी विविध ढंगांची कलाकृती नखांवर साकारली जाते. 

पुण्यात सध्या हा ट्रेंड जोमात आहे. हाय प्रोफाईल वस्त्या असणाऱ्या पाषाण, बाणेर, बालेवाडी, कोथरूड, फर्ग्युसन रस्ता, कोरेगाव पार्क या भागांमध्ये नेल आर्टची दालने सुरू आहेत.

वापरण्यात येणारी साधने 
  आकार देण्यासाठी ॲक्रेलिक
  नखांवर विविध चित्र उमटवण्यासाठी ‘स्टॅम्प’
  एलएडी तसेच जेल
  रंगबिरंगी नेलपेंटपासून छोटे छोटे तारे, मोत्यांचा वापर 
  सजावटी साठी ग्लिटर्स, नेल आर्ट पेन

दीड वर्षापासून नेल आर्ट करते. महिन्यातून तीन ते चार वेळा मी नेल आर्टसाठी पार्लरमध्ये जाते. यासाठी मी नेहमी दोन हजार रुपये व त्याहीपेक्षा जास्त खर्च करते.
- चित्रा पवार

नेल आर्ट शिकण्यासाठी मी थायलॅंडला गेलो होतो. आमच्या नेल आर्ट सेंटरमध्ये नेहमी २५ ते ३० महिला येतात. आम्ही त्यांच्या मागणीनुसार नेल आर्ट करतो. 
- प्रभाकर शिंदे, नेल आर्टिस्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com