नक्षत्रभेटीतून उलगडली शिंदे यांची कारकीर्द

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

पुणे - ‘पूना गेस्ट हाउस’च्या स्नेहमंचातर्फे आयोजित ‘नक्षत्रभेट’ या कार्यक्रमात अभिनेते अशोक शिंदे यांच्याशी दिलखुलास गप्पांची मैफील रंगली. अर्चना नामजोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली. शिंदे यांनी आपल्या खुमासदार शैलीत त्यांच्या कारकिर्दीतले अनेक किस्से सांगून श्रोत्यांना खेळवून ठेवले.

शिंदे यांनी गप्पांमधून आपला अभिनय प्रवास उलगडला. किशोर सरपोतदार आणि अभिनेत्री आशा काळे यांनी या गप्पांमध्ये भाग घेऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. शिंदे त्यांनी त्यांच्या फिटनेसचे रहस्य सांगितले. तसेच आपली वाटचाल विशद करताना आलेल्या अनेक कटू-गोड आठवणी, आनंद अभ्यंकरसारख्या मित्राचे अकस्मात जाणे आणि त्याच दिवशी वडिलांची छत्रछाया हरवणे, कष्ट करून देखील कलाकृतीला मिळालेले अपयश पचविताना आलेली विषण्णता अशा कलाकारांच्या भावविश्वातल्या अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. तसेच नाटक दौऱ्यामध्ये आलेले काही विनोदी प्रसंग सांगून त्यांनी श्रोत्यांना मनमुराद हसवले देखील.

Web Title: nakshtrabhet event ashok shinde