नालंदा शाळेची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियात नोंद

धायरी - महानाट्य सादर करताना नालंदा इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षक.
धायरी - महानाट्य सादर करताना नालंदा इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षक.

धायरी - धायरी येथील धायरेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या नालंदा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी आणि शिक्षकांसह  १८०० जणांनी श्रीकृष्णाचे बालपण, रासलीला नृत्यअभिनयातून सादर करीत संगीत गोपाळ कृष्ण महानाट्याचे सादरीकरण केले. याची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया व वंडर बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये करण्यात आली आहे.  

विद्यालयाच्या वार्षिक सांस्कृतिक कलामहोत्सवात सादर केलेल्या संगीत महानाट्यात तीन ते ५५ वयोगटातील १८०० विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. अडीच तासांत या महानाट्याचे सादरीकरण करण्यात आले. कलाकारांनी कृष्णजन्म, श्रीकृष्णाचे बालपण, रासलीलातील खोडकर श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित पौराणिक प्रसंग सलग सादर केले. नाटकच्या निर्मितीत मुख्याध्यापक डॉ. सुनीता चव्हाण, विलास खाडे, विकास कुंभार, मदन सूर्यवंशी यांनी विशेष प्रयत्न केले. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याचे प्रभावीपणे सादरीकरण करण्यात आले. पाच हजारांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी हा प्रयोग अनुभवला. याचे लेखन नंदकुमार कान्हेरे यांनी केले.  तर  दिग्दर्शन डॉ. सुनीता चव्हाण यांनी केले. ओंकार केळकर यांनी संगीत दिले. संतोष राउत, अनिवृद्ध हळंदे, नीता दोंदे, आरती पाठक आदींनी संयोजन केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या महानाट्याचे सादरीकरण पाहुन खासदार सुप्रिया सुळे देखील भारावून गेल्या. या विक्रमाचे परीक्षण वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे दिनेश पैठणकर, मुकेश कान्हेरे आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्डस्‌चे नरेंद्र बिंगी व डॉ. सुवर्णा श्री यांनी केले. या विक्रमाने शाळेची आणि संस्थेची प्रतिमा उंचावली असल्याची भावना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काका चव्हाण यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com