घरांवर मुलींच्या नावाची पाटी लावून सन्मान

कृष्णकांत कोबल
मंगळवार, 24 एप्रिल 2018

मांजरी खुर्द (पुणे) : मुलींच्या जन्माचे स्वागत आणि त्यांचा सन्मान ही एक चळवळ बनू पाहत आहे. ग्रामीण भागात या गोष्टीला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रमेश उंद्रे यांनी शिरूर तालुक्यातील एका जिल्हापरिषद गटाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपल्या गावातील प्रत्येक घरांंवर मुलींच्या नावाची पाटी झळकविण्याचा ध्यास घेतला आहे. स्वतःच्या घरासह काही मित्रांच्या घरापासून त्यांनी ही सुरुवात केली असून ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांनाही याबाबत सकारात्मक करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. 

उंद्रे यांनी गावातील मुलींच्या पालकांना भेटून  घरातील मुलींच्या सन्मानाची संकल्पना समजावून सांगितली. दरवाजावर घरातील मुलींच्या नावाची पाटी लावण्याच्या या संकल्पनेचे अनेक ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. 
कु. ऋतुजा उंद्रे, कु. रोहिणी नेवाळे,  कु.अणिता उंद्रे, कु. किरण बांगर, कु.ज्ञानेश्वरी सावंत, कु. शिवनंदीनी मत्रे या मुलींच्या पालकांनी त्याबाबत अग्रही भूमिका घेतल्याने उंद्रे यांनी लागलीच त्यांच्या नावाच्या पाट्या बनववून त्या-त्या घराच्या दरवाजावर लावल्या देखील आहेत. अनेक पालकांनी आपल्याही घरावर अशा पाट्या लावण्याची मागणी उंद्रे यांच्याकडे केली आहे. यावेळी पालक दत्तात्रय म्हस्के, रामभाऊ बांगर, महादेव सावंत, संजय गरूड, संजय उंद्रे आदी उपस्थित होते. 

रमेश उंद्रे म्हणाले, "एकीकडे मुलींच्या जन्माचे स्वागत आणि सन्मासाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या घटना कायद्या पेक्षाही सामाजिक मानसिकता बदलातून अधिक वेगाने कमी होऊ शकतील. त्यासाठी सामाजिक जाणीवेच्या प्रत्येकाने मुलींच्या सन्मानाची चळवळ हाती घेण्याची गरज आहे. मिळकतीवर मुलींचे नाव देण्याच्या माझ्या संकल्पाला विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सकारात्मकता दिल्यानंतर लगेचच मी हा उपक्रम हाती घेतला आहे. संपूर्ण गावात हा विचार सांगून प्रत्येक दारावर मुलींचे नाव आणण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी येणारा खर्चही मी करणार आहे.''

Web Title: name plates of girls on home