esakal | कोण होणार पुण्याचे एसपी; 'ही' नावे आहेत चर्चेत
sakal

बोलून बातमी शोधा

कोण होणार पुण्याचे एसपी; 'ही' नावे आहेत चर्चेत

राज्यात मुंबईपाठोपाठ पुणे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक सर्वच बाबतीत क्रमांक दोनचे शहर व जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकपदी विराजमान होण्याचे अनेक अधिका-यांचे स्वप्न असते.

कोण होणार पुण्याचे एसपी; 'ही' नावे आहेत चर्चेत

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : राज्यातील महत्वाच्या समजल्या जाणा-या पुणे जिल्हा पोलिस अधीक्षकपदी कोणाची वर्णी लागणार या बाबत सध्या उत्सुकतेचे वातावरण आहे. संदीप पाटील हे पदोन्नतीवर अतिरिक्त महानिरिक्षक म्हणून गेल्यानंतर आता पुण्याची जबाबदारी कोणावर सोपवली जाणार या बाबत चर्चा सुरु झाली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात मुंबईपाठोपाठ पुणे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक सर्वच बाबतीत क्रमांक दोनचे शहर व जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकपदी विराजमान होण्याचे अनेक अधिका-यांचे स्वप्न असते.

संवेदनशील जिल्हा म्हणूनही पुण्याची ओळख आहे. अष्टविनायकांपैकी अनेक देवस्थाने, राष्ट्रीय महामार्ग, औद्योगिक वसाहती यांचा समावेश जिल्ह्यात आहे. वेगाने विकसीत होणारा व जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती असलेला हा जिल्हा. या जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक आपल्या मर्जीतील असावा ही सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांची इच्छा असते. 

मराठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

उपमुख्यमंत्री अजित पवार हेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने साहजिकच त्यांच्या मर्जीतील अधिकारी पोलिस अधीक्षक म्हणून विराजमान होणार हे उघड आहे. पवार कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकतात या बाबत सध्या उत्सुकता आहे. बारामतीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्याकडे तात्पुरता पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. पाच दिवस उलटून गेले तरीही अधीक्षकपदाच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही. 

अभिनव देशमुख, मनोज पाटील यांच्यासह राजेंद्र माने यांच्या नावांची सध्या चर्चा सुरु आहे. या तिघांपैकी कोणाला संधी मिळते की ऐनवेळेस नवीनच नाव पुढे येते अशीही चर्चा सुरु आहे. मुंबईतच हा निर्णय होणार असल्याने सर्वांचेच डोळे मुंबईकडे लागून राहिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती लवकर होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. 

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : शैक्षणिक शुल्क होणार कमी? समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष​

जिल्हा अधीक्षकांना राजकीय नेतृत्वाची मर्जी सांभाळण्यासह गुन्हेगारीवर वचक ठेवणे, वाहतूकीचा प्रश्न मार्गी लावण्यासह अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार )