नाना पटोलेंच्या दौरयासाठी खड्डे भरणारया अधिकारयांना नागरीकांनी धरले धारेवर | Road Work | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road work
नाना पटोलेंच्या दौरयासाठी खड्डे भरणारया अधिकारयांना नागरीकांनी धरले धारेवर

नाना पटोलेंच्या दौरयासाठी खड्डे भरणारया अधिकारयांना नागरीकांनी धरले धारेवर

नसरापूर - नसरापूर येथे चेलाडी-वेल्हे रस्त्यावर गेले कित्तेक महिने अनेकवेळा मागणी करुन देखिल खड्डे न बुजवणारया सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी आज नाना पटोलेंच्या दौरयासाठी तातडीने खड्डे बुजवण्यास सुरुवात करताच, नसरापूर मधील ग्रामपंचायत सदस्य व नागरीकांनी या अधिकारयांना धारेवर धरले मान्यवरांसाठी खड्डे भरणारया अधिकारयांना सर्वसामान्य जनतेची किंमत नाही या बद्दल त्यांनी निषेध केला.

गुरुवार ता. 25 रोजी काँग्रेसचे राज्याध्यक्ष नाना पटोलें यांचा भोर व वेल्हे तालुक्यात दौरा आहे. या पार्श्वभुमीवर नसरापूर येथील चेलाडी-वेल्हा रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम तातडीने सुरु करण्यात आले. या कामावर पाहणीसाठी वेल्हे विभागाचे उपअभियंता संजय संकपाळ व कनिष्ठ अभियंता पी. जी. गाडे स्वतःहा उपस्थित होते. काम सुरु केले ते पाहताच नसरापूरचे ग्रामपंचायत सदस्य संदिप कदम, ग्राहक पंचायतीचे दिलीप फडके, नवनाथ कोंडे, शंभुराज कोंडे, प्रथमेश वनारसे आदी नागरीकांनी अभियंता संकपाळ यांची भेट घेऊन तातडीने काम कसे काय सुरु झाले, याची विचारणा केल्यावर अभियंत्यांनी उद्या मान्यवर येणार असल्याने खड्डे बुजवले जात असल्याचे सांगितले. यावर उपस्थित सर्व ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत तुम्हाला मान्यवरांची किंमत आहे. सर्वसामान्य जनतेची किंमत नाही का, गेले अनेक महिने येथे खड्डे आहेत, नागरीक यामध्ये पडुन जखमी होत आहेत, तुम्हाला याबाबत अनेक वेळा माहीती दिली गेली. परंतु, खड्डे बुजले गेले नाहीत. आज मात्र मान्यवर येणार म्हणुन खड्डे बुजवायला आला आहात. सर्वसामान्य नागरीक काही किंमत आहे कि नाही, असे प्रश्न विचारुन नागरीकांनी अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. शेवटी दोन्ही अधिकारयांना तेथुन काढता पाय घ्यावा लागला.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात ‘अमृतमहोत्सवाची-बालसंजीवनी’ हे खास अभियान सुरू

ग्रामपंचायत सदस्य संदिप कदम यांनी माहीती देताना सांगितले कि, आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने व मी व्यक्तिशः अनेकवेळा या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पाठपुरावा केला. या अधिकारयांना देखिल वारंवार विनंती केली. परंतु. या अधिकारयांनी कधीही प्रतिसाद दिला नाही. आज मात्र मान्यवर येणार आहेत म्हणुन स्वतःहा उभे राहुन काम करुन घेत आहेत. व येथील सार्वजनीक बांधकाम विभागाचे काम चांगले असल्याचा देखावा करत आहेत. त्यांना आम्ही सांगितले कि, मान्यवरांना खड्ड्यातुन जाऊ द्या, म्हणजे तुमच्या कामाची पावती मिळेल. सर्व सामान्यांना तुमच्या लेखी काय किंमत आहे हे यावरुन समजते आम्ही याचा निषेध करतो.

अभियंता संजय संकपाळ यांनी सांगितले कि, नसरापूर मधील या रस्त्यावर सतत खड्डे पडत असल्याने तीन ठिकाणी सिमेंट काँक्रीटीकरण होणार आहे. मात्र ठेकेदार उपलब्ध नसल्याने काम रखडले आहे. उद्या मान्यवर येणार असल्याने तात्पुरते खड्डे भरण्यात येत आहेत. थो़ड्याच दिवसात काँक्रीटीकरणाच्या कामास सुरुवात होईल.

loading image
go to top