nana patekar nanachi wadi
sakal
खडकवासला - सिंहगडावरुन खडकवासला धरणाकडे गेलेल्या डोंगररांगेच्या पायथ्याशी पायगुडेवाडी आहे. याच वाडीतील ‘नानाची वाडी’ हे प्रसिद्ध अभिनेते पद्मश्री पुरस्कार प्राप्त ‘नाना’ पाटेकर यांचे फार्महाऊस. नातेवाईक, मित्र आणि परिचितांच्या वर्दळीने नेहमी गजबजलेली ही वाडी नानांच्या उपस्थितीने चैतन्यमय असायची. मात्र, आज याच वाडीवर शोककळा पसरली होती.