जय मल्हार क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नानासाहेब मदने

चिंतामणी क्षीरसागर
शुक्रवार, 29 जून 2018

वडगाव निंबाळकर (पुणे) : जय मल्हार क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील नानासाहेब मदने यांची निवड झाली आहे. संघटनेच्या नुकत्याच झालेल्या पाटस (ता. दौंड) येथील बैठकीत राज्याचे अध्यक्ष दौलत उमाजी शितोळे यांच्या स्वाक्षरीचे पत्र मदने यांना देण्यात आले.

यावेळी बबनराव खोमणे, सुनिल चव्हाण, बापुराव खोमणे, गौरी चव्हाण, न्या. जयवंत खोमणे, गौरी चव्हाण, गंगाराम जाधव, अशोक बोडरे यांच्यासह विविध भागातून आलेले पदाधिकारी उपस्थीत होते. महाराष्ट्रातील बेरड, बेडर, रामोशी, बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी संघटना कार्यरत असते. मदने यांचे सामाजिक कामाची दखल घेउन जिल्हा स्तरीय जबाबदारी संघटनेने दिली आहे. यापुढील काळात समाजातील सर्व घटकांसाठी काम करणार असल्याचे मदने यांनी सांगीतले. 

Web Title: nanasahe madane selected as district chief of jai malhar kranti sena