nanded
nanded

पुण्यातील नांदेड फाटा परिसराबाबत धक्कादायक बातमी; वाचा सविस्तर वृत्त

किरकटवाडी : लॉकडाउन शिथिल करण्यात आल्यानंतर आता सिंहगड रोडवरील नांदेड फाटा परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. नांदेड फाटा परिसरातील जिजाई नगर, कोरडे बाग येथील एका 55 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकही दिवस घराच्या बाहेर न पडलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाली कशी? हे शोधण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे आहे.

ताप व श्वास घ्यायला त्रास जाणवत असल्याने सदर महिलेला तपासणीसाठी नऱ्हेगाव येथील नवले रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे या महिलेची कोरोना चाचणी केली असता शनिवारी रात्री सदर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती हवेली तालुका गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांच्याकडून देण्यात आली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या महिलेच्या घरातील सहा व्यक्तींना तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, इतर पाच व्यक्तींना होम क्वारंटाईन करून ठेवण्यात आले असल्याचे खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. वंदना गवळी यांच्याकडून सांगण्यात आले.

नांदेड फाट्यावरील ज्या भागात रुग्ण आढळला आहे, येथील परिसर हवेली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी ग्रामविकास अधिकारी नवनाथ झोळ व नितिश लगड यांच्या मदतीने सील केला आहे. नांदेड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून परिसर निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com