९ महिन्यात तर बाळ जन्माला येतं, पवारांच्या वक्तव्यावर राणे म्हणाले, "त्यांना प्रोसेस माहिती..."

narayan rane
narayan rane

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला होता. लहान बालकाच्या जन्मालाही इतका वेळ लागत नाही म्हणत अजित पवार यांनी सरकारवर टीका केली. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. 

नारायण राणे म्हणाले, मुलं होण्याचा आणि विस्ताराचा काय सबंध, अजित पवार यांना ती प्रोसेस माहित आहे. त्यांनी मंत्री असताना स्वत: काय केलं त्याची चौकशी सुरू आहे. 

राज्यातील सरकारला सात महिने झाले तरी मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही. राज्यात कर्तृत्वान महिला नाहीत का? २० लोक मंत्रिमंडळात आहेत. त्यात एखादी महिला मंत्री केली असती तर काही बिघडले असते का? फक्त म्हणता महिलांना संधी देऊ. पण कधी देणार? असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना करत ७ महिने झाले, ९ महिन्यात तर बाळ जन्माला येतं. यांना साधा मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही, अशी खोचक टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती.

narayan rane
Ravikant Tupkar : बुलडाण्यात खळबळ! पोलिसांच्या वेशात येत स्वाभिमानीच्या तुपकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न

हिंगोलीमधील सभेवेळी बोलताना अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला लक्ष्य केलं आहे. गेल्या सात महिन्यापासून मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही. सगळ्यांना सांगितले जाते तुम्हाला मंत्री करतो. तुम्हाला मंत्री करतो. ते म्हणतात कधी ? त्यांच्या घरच्यांनी सूट शिवले. फार गळा आवळायची वेळ आली पण मंत्रीपद काही मिळेना, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

narayan rane
Warishe Murder Case : वारिशेंच्या हत्येच्या प्रश्नावर नारायण राणे संतापले! म्हणाले, "तोच विषय..."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com