नारायणगाव - जुन्नर तालुक्यातील वडगाव-भोरवाडी रस्त्यावर दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही मोटर सायकलचे चालक ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे..अपघातात मोटरसायकल चालक ओमकार राजु कडाळे (रा. बोरी, साळवाडी ता. जुन्नर), गुलाब सहादु भोर (वय-55 रा. वडगाव, भोरवाडी ता. जुन्नर) या दोघांचा मृत्यू झाला असून आर्यन किरण साठे (रा. शिरोली तर्फे आळे ता. जुन्नर) हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास झाला..गुलाब भोर हे आज दुपारी भोरवाडी बाजुकडुन वडगाव बाजुकडे मोटरसायकल वर निघाले होते. दरम्यान येथील श्री दत्त मंदिराजवळ वळणावर विरुद्ध दिशेने ओमकार कडाळे व त्यांचा मित्र आर्यन साठे हे भरधाव वेगाने येत होते. वाहनाचे नियंत्रण सुटल्याने ओमकार कडाळे यांच्या मोटरसायकलची धडक गुलाब भोर यांच्या मोटरसायकलला बसली. या अपघातात दोन्ही मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले गंभीर जखमी झाल्याने कडाळे व भोर हे उपचारापूर्वीच मयत झाले..आर्यन साठे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी समीर गुलाब भोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहतूक नियमाचे उल्लंघन करून भरधाव वेगाने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयत ओमकार कडाळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.