

नारायणगाव - कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्टिफिशियल इंटेलिजंट (एआय) प्रणालीला भेदून उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने शेळ्यांच्या कळपावर झडप टाकली व एक वर्ष वयाचा बोकड शेतकऱ्यासमोर उचलून नेला. मात्र, सायरनचा आवाज झाला नाही. ही घटना बुधवारी (ता. १२) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वारुळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील निंबारकर वस्ती येथे घडली.