

leopard in pune
esakal
नारायणगाव: पुण्यातील नारायणगाव येथील पाटे-खैरे मळा शिवारामध्ये शुक्रवारी (दि. २६) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दुर्मिळ प्रसंग शेतकऱ्यांनी अनुभवला. गव्हाच्या शेतात दोन बिबट्यांमध्ये झुंज पेटली होती. चवताळलेल्या बिबट्यांची झुंज पाहून शेतात काम करणारे मजूर भयभीत झाले. नामदेव खैरे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी आरडाओरडा करून बिबट्याच्या दिशेने दगड फेकल्यानंतर दोन्ही बिबटे दोन दिशेने उसाच्या शेतात निघून गेले.