कुकडी कालव्याला गळती 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

नारायणगाव -ओढ्यावरील स्लॅब कलव्हर्ट खराब झाल्याने कुकडी डावा कालव्याला तांबेमळा (ता. जुन्नर) येथे सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली. कुकडी पाटबंधारे विभागाने याची तातडीने दखल घेऊन विसर्ग कमी केल्याने होणारे संभाव्य नुकसान टळले.

येडगाव धरण विभागाचे उपअभियंता बाळकृष्ण सावंत म्हणाले की, कुकडी डावा कालव्याची लांबी सुमारे २४९ किलोमीटर आहे. या कालव्याद्वारे जुन्नर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या तालुक्‍यांतील सुमारे ८० हजार हेक्‍टरला सिंचन केले जाते. येडगावमधून कुकडी कालव्यात १० मेपासून १ हजार ४०० क्‍युसेक पाणी सोडले होते. सोमवारी रात्री बेल्हे हद्दीतील डावा कालवा किलोमीटर क्र. १६ मधील साखळी क्र. २६ हजार ७२० (तांबेमळा) येथील ओढ्यावरील स्लॅब कलव्हर्ट गळती सुरू झाली. याबाबतची माहिती नागरिक व आमदार शरद सोनवणे यांनी कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नोर, सहायक कार्यकारी अभियंता सुचेता डुंबरे यांना दिली. गांभीर्य पाहून येडगावमधून डावा कालव्यात सोडलेला विसर्ग रात्री बारा वाजता कमी केला. सध्या कालव्यात सातशे क्‍युसेक विसर्ग सुरू आहे. विसर्ग कमी केल्याने परिसरातील शेती व घरांचे नुकसान टळले.

Web Title: narayangaon news Kukadi canal leakage

टॅग्स