दाभोलकर हत्येचा तपास पूर्ण न होणे ही नामुष्की: डॉ. हमीद दाभोलकर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला 20 ऑगस्टला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, विनय पवार, सारंग अकोलकर या आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. राज्य सरकार, तपासयंत्रणांनी मनात आणले, तर दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येची पाळेमुळे शोधून काढू शकतात. मात्र, ती इच्छाशक्ती हवी, असेही हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

पुणे - गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास कर्नाटक एसआयटीने नऊ महिन्यांत केला. मात्र, आपले राज्य सरकार पाच वर्षांत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पूर्ण करू शकला नाही, ही नामुष्कीची बाब आहे, असे मत डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले.

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील सद्य घडामोडींबाबत "सकाळ'च्या फेसबुक लाईव्हमध्ये ते बोलत होते.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला 20 ऑगस्टला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, विनय पवार, सारंग अकोलकर या आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. राज्य सरकार, तपासयंत्रणांनी मनात आणले, तर दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येची पाळेमुळे शोधून काढू शकतात. मात्र, ती इच्छाशक्ती हवी, असेही हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

आरोपींनी दिलेल्या जबाबातून या हत्या विचार संपवण्यासाठीच झाल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापुढे पोलिसांनी त्यांच्याकडे असलेली सगळी माहिती समोर आणून तपास केला नाही आणि या आरोपींचे संबंध असलेल्या संस्थांबाबत शासनाने आपली भूमिका जाहीर केली नाही, तर देशात अवघड परिस्थिती निर्माण होईल, अशी चिंता हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली.

Web Title: Narendra Dabholkar murder case inquiry Hamid Dabholkar