कळसकरच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ

Narendra-Dabholkar
Narendra-Dabholkar

पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या शरद कळसकर, राजेश बंगेरा, अमित डिगवेकर यांच्या तपासाबाबत सत्र न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

कळसकरसह तिघांची "सीबीआय' कोठडी सोमवारी संपल्याने पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी कळसकरच्या "सीबीआय' कोठडीत 15 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. बंगेरा व डिगवेकर या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

"सीबीआय'चे वकील विजकुमार ढाकणे यांनी आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर बचाव पक्षाचे वकील धर्मराज चंडेल यांनी आरोपींना "सीबीआय' कोठडी सुनावल्यापासून तपासात अद्याप कोणतीही प्रगती झाली नाही, असा युक्तिवाद करून न्यायालयीन कोठडीची मागणी केली. मागील सुनावणीमध्ये "सीबीआय'च्या वकिलांनी कोठडीसाठी युक्तिवाद करू नये, तर केवळ अहवाल द्यावा, अशा उच्च न्यायालयाच्या सूचना असल्याचे "सीबीआय'च्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते. बचाव पक्षाच्या वकिलांनी या मुद्द्यावर भाष्य करताना उच्च न्यायालयाच्या अशा कोणत्याही सूचना नसल्याचे न्यायालयाला सांगितले. दरम्यान, सुनावणीदरम्यान बंगेरा हा "सीबीआय' कोठडीत असताना "एसआयटी'ने गोविंद पानसरे हत्या प्रकरणाबाबत त्याची चौकशी केली. त्या वेळी "एसआयटी'ने त्रास दिला, असे बंगेराने न्यायालयाला सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com