'मोदींची हवा आणखी पंधरा वर्षे राहणार'

'मोदींची हवा आणखी पंधरा वर्षे राहणार'

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा आणखी दहा ते पंधरा वर्षे राहणार आहे. त्यानंतर काय निर्णय घ्यायचा ते पाहू. पण, सध्या जिकडे आठवले; तिकडे हवा असेल. मोदींनी, सबका साथ सबका विकास, हा मुद्दा घेऊन निवडणूक लढविल्यामुळे २८२ जागा मिळाल्या. जेव्हा राममंदिराचा मुद्दा घेऊन निवडणूक लढविली तेव्हा १८२ जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे राममंदिराचा मुद्दा सामोपचाराने सोडविण्याची गरज आहे. तो सोडविताना कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.  

आठवले म्हणाले, की उद्धव ठाकरे यांना राममंदिराच्या मुद्यावरून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण, मंदिरासाठी अध्यादेश काढण्याचा आग्रह धरू नये. न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी. ठाकरे आल्यानंतर मीसुद्धा अयोध्येला जाणार आहे. अयोध्यामधील काही व्यक्तींकडून तिथे येण्याचे निमंत्रण मिळाले आहे. तिथे जाऊन दोन्ही समाजाच्या नागरिकांशी संवाद साधून सामोपचाराने प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. यातील काही जागा हिंदूंना, काही मुस्लिमांना, तर उरलेली जागा बुद्ध मंदिर बांधण्यासाठी द्यावी, अशीही मागणी आठवले यांनी केली.

या वेळी गंगाधर आंबेडकर, एम. डी. शेवाळे, डॉ. सिद्धार्थ धेंडे, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, महेश शिंदे, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, महिपाल वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संभाजी भिडेंबाबत पुन्हा तपास करा
भीमा कोरेगावची दंगल पूर्वनियोजित होती. मात्र, या प्रकरणाशी एल्गार परिषदेचा संबंध नव्हता. संभाजी भिडेंविरुद्ध पुरावे नसल्याचे सांगितले जाते. परंतु, त्याचा पुन्हा कसून तपास झाला पाहिजे. या वर्षी १ जानेवारीला भीमा कोरेगाव इथे काहीही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी. तशा सूचना देणार असल्याचेही आठवले म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com