esakal | कोरोना काळात नारीशक्तीची अ‍ॅम्ब्युलन्स ठरतेय देवदूत

बोलून बातमी शोधा

Nari Shakti ambulance helping to patients in the Corona period
कोरोना काळात नारीशक्तीची अ‍ॅम्ब्युलन्स ठरतेय देवदूत!
sakal_logo
By
किशोर गरड

दत्तनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये( Second Wave Of Corona) सरकारी आरोग्य व्यवस्थेची मोठी पंचाईत झाली आहे. त्यात ऑक्सिजनची कमतरता(Lack of oxygen), रेमडीसिव्हीर इंजेक्शनची कमतरता, व्हेंटिलेटर बेडची उपल्बध नसने आदी प्रश्न ऐरणीवर आलेले पाहायला मिळाले. यात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे रुग्णवाहिका ambulance होय. पुणे शहरात रुग्णवाहिकांची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासत होती. बऱ्याच रुग्णवाहिकांनी रुग्णांच्या नातेवाईकांकडून(patients and Relative) जास्तीचे शुल्क(Extra Fees) आकारल्याच्या घटनाही घडल्या. महानगरपालिकांना(Pune Municipal Corporation) रुग्णवाहिकांचे शुल्कदर ठरवून द्यावे लागले. अशा परस्थितीत दक्षिण पुण्यातील नारीशक्ती सामाजिक संस्थेची रुग्णवाहिका मात्र आंबेगाव बुद्रुक(Ambegav budruk , आंबेगाव खुर्द (Ambegav Khurd), दत्तनगर(Datta Nagar), जांभूळवाडी(Jambhulwadi), कोळेवाडी(Kolewadi) या परिसरात देवदूत ठरली आहे. (Nari Shakti ambulance helping to patients in the Corona period)

हेही वाचा: 20 दिवसानंतर पुण्यात पेट्रोल-डिझेल महागलं; पाहा आजचे दर

ही रुग्णवाहिका विनाशुल्क पुरविली जाते. आताचा कोरोना काळ असो वा इतर वेळ रुग्णवाहिका ही विनाशुल्कच मिळते. आंबेगावचा परिसर हा झपाट्याने विकसित होत असलेला परिसर आहे. परिसरात मुख्यत: कष्टकरी, कामगार वर्ग वास्तव्यास आहे. याचा विचार करून २०१२ पासून ही रुग्णवाहिका नागरिकांची अविरतपणे सेवाकार्य करते आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही रुग्णवाहिका विनाशुल्क रुग्णांना पोहचवते. परिसरातून मुंबई बंगळुरू महामार्गही जातो आहे. दरम्यान, महामार्गावर अपघात होतात. या आपत्कालीन वेळी, शिवाय परिसरातील जांभूळवाडी तलावात व्यक्ती बुडतात त्यावेळीही रुग्णवाहिका पोलीस यंत्रणेला मदत करते. रुग्णांना घरी किंवा दवाखान्यात पोहचवत असताना, ''रुग्ण नातेवाईकांकडून चालकांनी चहा नाष्टयाचे पैसे ही घ्यायचे नाहीत'' अशी तंबी नारीशक्ती सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा पल्लवी प्रसाद जगताप यांनी दिली आहे. सध्याच्या कोरोना महामारीमध्ये दक्षिण पुण्यातील देवदूत झाली आहे.

हेही वाचा: पुण्यात रेमेडिसिव्हिरविना ९१ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात

एका खेपेला रुग्णवाहिकेला साधारणतः ४ ते ५ हजार रुपये खर्च होतो. हा खर्च निव्वळ सेवाभावीवृत्तीमधून पल्लवी जगताप करत आहेत. कोरोना काळात विनाशुल्क रुग्णवाहिका पुरवायची हा नवीन पायंडा पल्लवी जगताप यांनी याद्वारे पाडला आहे.

''परिसरातील कष्टकरी आणि कामगार वर्गासह सामान्य नागरिकांसाठी ही सेवा सुरु करावी असे वाटले.त्यांना हॉस्पिटल एमर्जन्सीमध्ये एक मदत म्हणून हा उपक्रम संस्थेकडून राबविला जातो आहे. सध्याच्या कोरोना काळातही विनाशुल्क रुग्णवाहिका पुरविली जाते. सेवा परमो धर्म या प्रमाणे संस्था काम करते आहे.''

- पल्लवी प्रसाद जगताप, संस्थापक अध्यक्षा नारीशक्ती सामाजिक संस्था.

हेही वाचा: 'आमचे दोन्ही देव चोरीला गेले हो...' दोन्ही मुले गमावलेल्या ज्येष्ठ मातापित्यांचा टाहो

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा