नाशिक महामार्गाचे नारायणगावला रुंदीकरण सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

नारायणगाव - वाहतुकीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी नारायणगाव शहरातून जाणाऱ्या ५.३ किलोमीटर लांबीच्या जुन्या पुणे नाशिक महामार्ग रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात साइडपट्ट्याच्या भरावाचे काम सुरू आहे. या कामासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून २२ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

खेड ते सिन्नर महामार्गाचे काम लांबले असल्याने राजगुरुनगर व नारायणगाव येथे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. महामार्गाच्या रुंदीकरणासाठी खासदार आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून ३८ कोटी ९३ लाख रुपयांचा निधी खास बाब म्हणून मंजूर झाला आहे.

यापैकी नारायणगाव येथील रिलायन्स पेट्रोल पंप ते बाह्यवळण जोड रस्ता दरम्यानच्या रस्त्यासाठी २२ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हे काम कोंढवा येथील रोडवेज सोल्यूशन कंपनीने सुरू केले आहे.

रिलायन्स पंप ते रजिस्टर कचेरीदरम्यानच्या महामार्गाच्या साइडपट्ट्याच्या भरावाचे काम सध्या सुरू आहे. जुना महामार्ग रस्ता सात मीटर रुंदीचा आहे. या रस्त्याची रुंदी दहा मीटर करण्यात येणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दीड मीटर रुंदीचे फूटपाथ व बंदिस्त ड्रेनेज करण्यात येणार आहे. हे काम पुढील दीड महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्या प्रतिनिधीने दिली.

ठेकेदाराने काम बंद केल्याने राजगुरुनगर व नारायणगाव येथील बाह्यवळण रस्त्याचे काम थांबले आहे. यामुळे वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दोन बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी ७५ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. नारायणगाव व राजगुरुनगर येथील बाह्यवळण रस्त्याचे प्रलंबित काम जानेवारी महिन्यात सुरू होईल. त्यानंतर दीड महिन्यात दोन्ही बाह्यवळण रस्त्यांची कामे पूर्ण होतील.
- आढळराव पाटील, खासदार  

Web Title: Nashik Highway Work Development