
किरकटवाडी (पुणे) : पुणे व परिसरामध्ये सध्या कोरोना अतिशय वेगाने पसरत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे दवाखान्यांसह डॉक्टर, नर्स व रुग्णालयाच्या संबंधित इतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासू लागली आहे. शासनाच्या वतीने कोविड केअर सेंटरवर डॉक्टरांची नेमणूक करण्यासाठी खासगी क्षेत्रामध्ये वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना आवाहन केले. परंतु, त्यालाही जास्त प्रतिसाद मिळताना दिसत नाही. अशा परिस्थितीत सिंहगड रोडवरील नांदेड फाट्याजवळ तब्बल पंचवीस वर्ष दवाखाना चालवून रुग्णसेवा केलेल्या व सध्या नाशिक येथील आपल्या मूळ गावी शेतीसह परिसरातील लोकांच्या रुग्णसेवेत रमलेल्या डाॅ. बाळासाहेब आहेर यांनी पुन्हा पुण्यामध्ये रुग्णसेवेसाठी येत वैद्यकीय क्षेत्रासह समाजापुढेही एक नवा आदर्श उभा केला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
डॉ. बाळासाहेब आहेर हे पुण्यामध्ये असताना काही वर्ष सिंहगड रोड डॉक्टर्स असोसिएशनचे सचिव होते. तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता होती. सिंहगड रोड परिसरातील सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट, नऱ्हे येथे उभारलेल्या सेंटर साठी डॉक्टरांचा शोध सुरू असताना हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी डॉ. बाळासाहेब आहेर यांच्याकडे संपर्क केला व त्यांची गरज असल्याने कोणतेही कारण न सांगता तातडीने पुण्याला येण्याची विनंती केली. सिंहगड रोड परिसराशी रुग्ण सेवेच्या माध्यमातून आपुलकीचे नाते निर्माण झालेल्या डॉ. आहेर यांनी तातडीने होकार दिला व ते पुण्यामध्ये दाखल झाले.
डॉ. आहेर यांनी दोन दिवस खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्रावर काम केले. हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता डॉ. आहेर यांच्याशी चर्चा केली. डॉ. आहेर यांचा अनुभव आणि रुग्ण हाताळण्याची पद्धत पाहिल्यानंतर गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी आहेर यांच्याकडे सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे उभारलेल्या कोविड केअर सेंटरची जबाबदारी देण्याचे ठरवले. खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. वंदना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आहेर हे सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट येथील कोविड केअर सेंटरवर पूर्णवेळ आपली सेवा देत आहेत. सध्या जवळपास 60 रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत व दिवसेंदिवस खडकवासला, खानापूर,सांगरून व खेड शिवापूर या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील कोरोना रुग्ण उपचार घेण्यासाठी येथे येत आहेत.
"पंचवीस वर्ष पुण्यामध्ये रुग्ण सेवा केल्यानंतर पुढील जीवन गावातील लोकांच्या सहवासामध्ये घालवण्याचा निर्णय घेऊन मागील वर्षी मूळगावी नाशिक येथे गेलो होतो. त्याठिकाणी परिसरातील लोकांसाठी वैद्यकीय सेवाही देत होतो. पुणे व परिसरामध्ये रुग्ण संख्या वाढत असताना एक डॉक्टर म्हणून प्रशासनाला मदत करण्यासाठी व रुग्णांच्या सेवेसाठी मी तातडीने पुण्याला येण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाकडून यासाठी मला वीस हजार रुपये मानधन मिळत आहे. परंतु, त्याहीपेक्षा मिळणारे रुग्णसेवेचे समाधान माझ्यासाठी अमूल्य आहे. खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णसेवेसाठी पुढे येण्याची गरज आहे."
-डॉ. बाळासाहेब आहेर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.