Nasrapur Child Murder: नसरापूर चिमुकली अत्याचार-खून प्रकरण; आरोपी दोषी, फाशी की जन्मठेप? २९ जूनला होणार फैसला

Death Penalty Demand in rarest of rare child Murder case: नसरापूरच्या चिमुकलीवरील अत्याचार-खून प्रकरणात भीमराव कांबळे दोषी ठरला; दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा मानत सरकार पक्षाची फाशीची मागणी, २९ जूनला शिक्षेचा निकाल जाहीर होणार
Nasrapur Case

Nasrapur Case

esakal

Updated on

पुणे : नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला विशेष न्यायालयाने दोषी ठरविले. सरकार पक्षाने हा गुन्हा "दुर्मिळातील दुर्मिळ" स्वरूपाचा असल्याचे नमूद करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तर न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून निकाल राखून ठेवला असून २९ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. कांबळे याला मृत्युदंड की जन्मठेप यावर निकाल होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com