Baneshwar Mahadev TempleESakal
पुणे
Pune News: महादेव मंदिरात ‘शर्ट काढून दर्शन’ घेण्याची प्रथा रद्द, पुण्यातील 'या' ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय
Baneshwar Mahadev Temple News: भोर तालुक्यातील नसरापूर ग्रामसभेने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. बनेश्वर महादेव मंदिरात ‘शर्ट काढून दर्शन’ घेण्याची प्रथा ग्रामस्थांच्या मागणीवरून रद्द करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. श्रीक्षेत्र बनेश्वर महादेव मंदिरात ‘शर्ट काढून दर्शन’ घेण्याची प्रथा ग्रामसभेच्या ठरावाद्वारे तात्काळ रद्द करण्यात आली आहे. यामुळे आता या निर्णयाचे कौतुक होत आहे.