esakal | नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्रावरुन रंगले श्रेयाचे राजकारण
sakal

बोलून बातमी शोधा

नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्रावरुन रंगले श्रेयाचे राजकारण

नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्रावरुन रंगले श्रेयाचे राजकारण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नसरापूर : भोर तालुक्यातील महामार्ग पट्ट्यात ट्रामा केअर सेंटर होणे ही आमदार संग्राम थोपटे यांची संकल्पना असुन नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध करण्यापासुन रुग्णालय मंजुरी पर्यंत आमदार थोपटे जिल्हा परिषद सद्स्य म्हणुन माझे प्रयत्न असुन या कामाचे श्रेय जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी घेऊ नये, अशी टिका जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे व पंचायत समिती सदस्य रोहन बाठे यांनी केली आहे.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी पत्रकांरांना माहीती देताना नसरापूर येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर होत असुन या बाबत पाठपुरावा केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी तत्वता मान्यता दिल्याचे म्हटले होते त्यास आज नसरापूर भोलावडे गटाचे काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे व भोंगवली पंचायत समितीचे सदस्य रोहन बाठे यांनी उत्तर देताना नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राची जागा अपुरी असल्याने नविन जागेसाठी जिल्हा परिषद सदस्य व आरोग्य समिती सदस्य या नात्याने विठ्ठल आवाळे यांनी आमदार थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य समितीच्या बैठकीत ठराव करुन 9 आक्टोंबर 2017 च्या सर्वसाधारण सभेत त्यास मंजुरी घेतली आहे.

हेही वाचा: "जे ममता बॅनर्जी-मायावतींनी करुन दाखवलं ते पवारांना जमलं नाही"

आरोग्य केंद्रासाठी महामार्गालगत पशुवैद्यकीय दवाखान्याची जागा उपलब्ध करण्यासाठी आमदार संग्राम थोपटे यांनी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांच्याकडे पाठपुरावा करुन 14 जुलै 2020 रोजी सुनिल केदार यांच्या अध्यक्षते खाली संबधीत अधिकारी व आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्णय होऊन नसरापूर चेलाडी येथील पशुसंवर्धनची 84 गुंठे पैकी 40 गुंठे जागा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी हस्तांतरीत करण्याच निर्णय झाला आहे व ती जागा आता जिल्हा परिषद पुणे कडे हस्तांतरीत होत आहे.

महामार्गावर अपघातग्रस्तांसाठी तातडीने उपचार मिळावेत यासाठी ग्रामीण ट्रामा केअर व्हावे यासाठी देखिल आमदार थोपटे प्रयत्नशील होते त्यांनी यासाठी महामार्गावरील दोन ते तीन ठिकाणच्या जागा सुचवल्या होत्या त्या मध्ये आता चेलाडी येथे जागा उपलब्ध झाल्याने तेथेच अजुन जागा उपलब्ध करुन ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर मंजुर होण्याच्या मार्गावर आहे हे काम होत असल्याने याचे श्रेय काँग्रसकडे जाऊ नये यासाठी काहीजण अपप्रचार करत श्रेय घेत आहेत मात्र हे काम काँग्रेस पक्षानेच केले असुन या बाबतीतले प्रयत्न जनतेला माहीती आहेत त्यामुळे कोणी दिशाभुल करण्याचा प्रयत्न करु नये अशी टिका रणजीत शिवतरे यांचे नाव न घेता करण्यात आली आहे.

हेही वाचा: मुश्रीफ १९ महिने झोपले होते का? घोटाळ्याच्या आरोपावरून पाटलांचे उत्तर

यावेळी आवाळे व बाठे यांनी यासंदर्भात झालेला पत्रव्यवहार व कागदपत्रे पत्रकारांसमोर सादर केली. या बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार यांच्याशी संपर्क साधला असता चेलाडीची जागा नसरापुर आरोग्य केंद्रासाठी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत होत आहे मात्र ग्रामीण रुग्णालय किंवा ट्रामा सेंटर उभारणे हे जिल्हा परिषदेचे काम नसुन राज्या शासनाचे अखत्यारीतले आहे राज्य शासनच या बाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

loading image
go to top