पुणे - ‘विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देणे, ही शिक्षकांची जबाबदारी आहेच. आता तर शालेय शिक्षण विभागाने ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना हाती घेतली आहे. या संकल्पनेला पुढे नेत असताना, गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षणातून उद्याच्या भारताचा नागरिक घडणे आवश्यक आहे.