

National Pension Scheme
sakal
NPS pension scheme benefits after retirement : सकाळ आणि पीएफआरडीए (पेन्शन निधी नियामक व विकास प्राधिकरण) यांच्या संयुक्त विद्यमाने निवृत्तीनंतरचे आयुष्य अर्थपूर्ण करण्यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम “पेन्शन ने प्रगती” आयोजित करण्यात आला. नोकरी अथवा व्यवसायातून निवृत्ती हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर नियमित उत्पन्न नसल्याने आर्थिक सुरक्षिततेची गरज अधिक तीव्रतेने भासते. त्यामुळे निवृत्तीपूर्व नियोजन आणि दीर्घकालीन बचत ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाचे महत्त्व समजावून देण्यासाठी सविस्तर माहितीपर मार्गदर्शन कार्यक्रम दि. 23 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता, हॉटेल रामी ग्रँड, पुणे येथे आयोजित करण्यात आला. पुणे ग्रँड सायकल स्पर्धेमुळे रस्ते बंद असतानाही या कार्यक्रमाला पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.