राष्ट्रवादी 'कोअर कमिटी'ची आज पुण्यामध्ये बैठक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

शरद पवार आणि सोनिया गांधी यांची रविवारी बैठक ठरली होती; पण ती रद्द झाली. विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले शरद पवार आज (शनिवार) पुण्यात आले, त्यांच्यासह इतर नेतेही पुण्यात आले आहेत. रविवारी दुपारी चारच्या सुमारास राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक बारामती हॉस्टेल किंवा पवार यांचे निवासस्थान असलेल्या मोदी बागेत होण्याची शक्‍यता आहे.

पुणे : राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग येत असताना रविवारी (ता. 17) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पुण्यामध्ये होत आहे. यात महाशिवआघाडीच्या मसुद्यावर चर्चा होणार असल्याचे समजते. 

शरद पवार आणि सोनिया गांधी यांची रविवारी बैठक ठरली होती; पण ती रद्द झाली. विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले शरद पवार आज (शनिवार) पुण्यात आले, त्यांच्यासह इतर नेतेही पुण्यात आले आहेत. रविवारी दुपारी चारच्या सुमारास राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक बारामती हॉस्टेल किंवा पवार यांचे निवासस्थान असलेल्या मोदी बागेत होण्याची शक्‍यता आहे. त्यामध्ये पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे.

सोमवारी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्याच वेळी सोनिया गांधी आणि पवार यांची भेट होणार असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व घडामोडींची चर्चा करून आढावा घेतला जाणार आहे, असे वर्तविले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nationalist Congress Core Committee meeting in Pune today