वृक्षसंवर्धनासाठी ‘रानमळा पॅटर्न’ची देशपातळीवर सुरवात; सरकारचा पुढाकार

पुण्यातील खेड तालुक्यात रानमळा गावाने वृक्षसंवर्धनासाठी एक आगळीवेगळी चळवळ सुरू केली आहे.
Tree Planting
Tree PlantingSakal

पुणे - पुण्यातील खेड तालुक्यात रानमळा गावाने (Ranmala Village) वृक्षसंवर्धनासाठी (Arboriculture) एक आगळीवेगळी चळवळ सुरू केली आहे. या ‘रानमळा पॅटर्न’ची आता देशपातळीवर सुरवात करण्यासाठी सरकारने (Government) पुढाकार (Initiative) घेतला आहे. रानमळा गावात वृक्षसंवर्धनाची चळवळीची सुरवात १९९६ मध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पी. टी. शिंदे यांनी केली होती. या उपक्रमास आता २५ वर्षे पूर्ण झाले आहेत. (Nationwide Launch of Ranmala Pattern for Arboriculture Government Initiative)

शिंदे म्हणाले, ‘वृक्षसंवर्धनासाठी काही तरी करायचे या अनुषंगाने शाळेतील मुलांना रोपे वाटून या उपक्रमाची सुरवात केली होती. दरवर्षी मुलांना रोपे दिली जात होती मात्र, त्यातील अनेक रोपे लावली जात नव्हती किंवा लावली तर त्यांची योग्य देखभाल घेतली जात नव्हती. त्यामुळे हा उपक्रम थांबविला. त्यानंतर गावातील लोकांना वृक्षरोपनाचे महत्त्व पटवून देत रानमळा चळवळ सुरू झाली. गावातील शोषखड्ड्यात वृक्षारोपण करणे, घरी मुल जन्माला आले, मृत्यू झाला किंवा लग्न सोहळा झाला तर त्या कुटुंबाला आपल्या घरी एक झाड लावण्यासाठी दिले जाते. उपक्रमांतर्गत आतापर्यंत १३ हजार हून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. सुमारे ९७ टक्के झाडे जगली आहेत.’

Tree Planting
पुणे विद्यापीठात Foreign Languageसाठी अ‍ॅडमिशनला सुरूवात

अडचणी काय?

  • शेतातील बांधावर लावण्यात आलेल्या झाडांचे नांगरणी दरम्यान होणारे नुकसान

  • वेळेत पाणी न मिळाल्याने झाडे जगली नाही

  • रोपांच्या संरक्षणासाठी जाळे न लावल्याणे रोपे शेळी व इतर प्राणी खातात

‘रानमळा पॅटर्न’चा जीआर तयार करण्यात आला आहे. हा जीआर मराठीसह हिंदी आणि इंग्रजी या भाषेत रुपांतरीत करून देशातील विविध राज्यात पाठविण्यात आला आहे. त्यामुळे वृक्षारोपणाची चळवळ देश पातळीवर पोचली आहे.

- डॉ. वाय. एल. पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण

वृक्षारोपणाच्या या चळवळीत आम्ही फक्त स्वदेशी झाडांना प्राधान्य देत आहे. त्या अनुषंगाने गावातील मोकळ्या परिसरात आवळा, पिंपळ, करंज, चिंच अशी झाडे तर ग्रामस्थांच्या अंगणात चिक्कू, सीताफळ, आंबा, नारळ, फणसासारखी फळांची झाडे लावण्यात येतात.

- पी. टी. शिंदे, अध्यक्ष, संयुक्त वन व्यवस्थापन समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com