नाट्य निर्माता संघाने शरद पवारांना पाठवलं पत्र; काय आहे कारण?

Sharad_Pawar
Sharad_Pawar
Updated on

पुणे : गरजू नाट्यकर्मी आणि कामगारांना आर्थिक मदत देण्यावरून नाट्य परिषद आणि पुण्यातील रंगकर्मींमध्ये वाद सुरू झाला आहे. मदत देताना पुण्याला डावलल्याची भावना केली जात असून, नाट्य निर्माता संघाने नाट्य परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांना पत्र पाठविले आहे.

लॉकडाऊनमुळे नाट्यगृहे बंद झाल्यानंतर निर्माते, कलाकार आणि पडद्यामागील कलाकारांपुढे आर्थिक संकट उभे राहिले. त्यांना मदत करण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेने नाट्यकर्मी मदत निधी उभा केला. त्यात परिषदेनेही योगदान दिले. सुमारे एक कोटी रुपये यात जमा झाले. पुण्यातील कुणालाही मदत मिळालेली नाही, अशी तक्रार केली जात आहे. 

नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले, "मुंबईतील काही विशिष्ट लोकांना ही मदत देण्यात आली. पुण्यातील गरजू  कलाकार, लावणी कलाकार आणि कामगार यांना मदत मिळालेली नाही. नाट्य परिषदेचे सभासद असलेल्या कलाकारांना मदतीचा एकही पैसा मिळालेला नाही. त्यांना डावलण्यात आले असून, ही वागणूक अन्यायकारक आहे. त्यामुळेच पुण्यातील नाट्य निर्माता संघाच्या माध्यमातून नाट्य परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांना पत्र पाठवून मदतीची मागणी केली आहे."

परिषदेकडे गरजू कलाकारांना मदतीची मागणी करूनही मदत देण्यात आली नाही. म्हणून हे पत्र पाठवावे लागले आहे, असे राजेभोसले यांनी स्पष्ट केले. त्यांनी या पत्रात 32 नाट्य आणि लावणी निर्माते, 75 कलाकार आणि 300 कामगार यांची परिस्थिती बिकट आहे. त्यांना परिषदेच्या मातृसंस्थेने मदत केलेली नाही, असे म्हटले आहे.

नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी हे आरोप फेटाळले आहेत. 'सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, "नाट्यकर्मी मदत निधीचे आवाहन जुलै महिन्यात केले होते. त्यात कोणत्या संस्थांशी संबंधित कलाकारांना आणि कामगारांना मदत केली जाणार आहे, हे स्पष्ट केले होते. त्या संस्थांकडून आलेल्या यादीतील गरजू व्यक्तींना मदत दिली आहे."

जमा झालेल्या निधीचे वितरण जून महिन्यात करण्यात आले आहे. तोपर्यंत पुण्यातून कुणी मागणी केली नाही. आता महिनाभरानंतर मागणी कशासाठी केली जात आहे? शरद पवार यांना पाठविलेले पत्र हे नाट्य निर्माता संघाच्या लेटरहेडवर आहे. ही संस्था नाट्य परिषदेची घटक संस्था नाही. त्यामुळे त्यांना मदत करता येणार नाही, असे कांबळी यांनी स्पष्ट केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Accommodation, food, sanitation and rain-related arrangements have been strengthened to facilitate thousands of Warkaris.
Savitribai Phule Pune University announced the revised schedule to ensure that candidates do not miss the SET examination.
Major Pune Roads to Close this Thursday
The victim's family alleged that they received inadequate support from the administration during the search operation.
Marathi News Esakal
www.esakal.com