पारदर्शी, गतिमान कारभारावर भर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

पुणे - लोकांची नेमकी मागणी आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांना प्राधान्यक्रम देण्यात येईल. केंद्र आणि राज्य सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पारदर्शी, कार्यक्षम आणि गतिमान कामकाजावर आपला भर राहील, असे पुण्याचे नवनियुक्‍त जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले. 

त्यांनी मंगळवारी सौरभ राव यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. राम हे महाराष्ट्र आयएएस केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी विदर्भात यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच मराठवाड्यात बीड येथे तीन वर्षे, तर औरंगाबाद येथे एक वर्ष जिल्हाधिकारीपदावर काम केले आहे. या कालावधीत ग्रामीण आणि दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारी योजनांची सर्वव्यापी अंमलबजावणी केली. बीड जिल्ह्यात कार्यरत असताना शेतकऱ्यांना राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत एका वर्षात एक हजार दोनशे कोटी रुपये उपलब्ध करून दिले. पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्यासह विविध योजनांचा लाभ नागरिकांना करून दिला, असे राम यांनी सांगितले. 

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना विश्‍वासात घेणार 
औरंगाबाद येथे असताना राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गासाठी सहा महिन्यांत ७० टक्‍के म्हणजे ८६० हेक्‍टर जमिनीचे भूसंपादनाचे काम पूर्ण केल्याचे राम यांनी सांगितले. त्यावर पत्रकारांनी पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी विरोध असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊन हा प्रश्‍न सोडविला जाईल. प्रकल्प महत्त्वाचा आहे, ही बाब लक्षात आणून दिल्यास तेथील नागरिक सहकार्य करतील, असा विश्‍वास राम यांनी व्यक्‍त केला.

Web Title: naval kishor ram work