

Pune Navale Bridge Crash
Esakal
कात्रज-देहूरोड बायपासवरील नवले पुलाजवळ असलेल्या भूमकर पुलावर आज मध्यरात्री एका मालवाहू कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या भरधाव कंटेनरने ट्रकला आणि इतर काही वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कंटेनरमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, इतर काही जण जखमी झाले आहेत.