Navale Bridge Accident : नवले पुलावर अपघाताची मालिका सुरुच, मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला अन्... पहाटे थरारक अपघात

Drunk Driving Accident Pune : नवले पूल हा पुणे–बेंगळूरू महामार्गावरील धोकादायक ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखला जातो.काही दिवसांपूर्वी कंटेनर अपघातात ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.त्यानंतर पुन्हा पाच वाहनांचा एकमेकांना धडकून अपघात झाला.
A car damaged after crashing into the divider due to a drunk driver on Navale Bridge, Pune-Bangalore Highway during early morning hours.

A car damaged after crashing into the divider due to a drunk driver on Navale Bridge, Pune-Bangalore Highway during early morning hours.

esakal

Updated on

Summary

  1. आज पहाटे मद्यधुंद कारचालकाने दुभाजकाला धडक दिली.

  2. त्या वेळी महामार्गावर वर्दळ कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.

  3. सलग होणाऱ्या अपघातांमुळे नवले पूल पुन्हा चर्चेत आला आहे.

पुणे- बेंगळूरू महामार्गावरल ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवले पुलावर काही दिवसांपूर्वी कंटेनरच्या भीषण अपघातात ८ जणांना जीव गमावावा लागल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा सकाळी अपघात घडला आहे. सोमवारी सकाळी पुण्यावरुन बेंगळुरुच्या दिशने जाणारी कार दुभाजकाला धडकली यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. प्राथमिक माहितीनुसार कारचालकाने मद्यपान केले होते. पहाटे महामार्गावर वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे प्रत्यदर्शींनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com