नवरात्रोत्सवात करूयात ‘नवरंगां’ची उधळण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्याने वातावरण चैतन्यमय झाले आहे. हे उत्सव आपल्याला ऊर्जा देत असतात. नवरात्रोत्सव हा आदिशक्तीचा जागर असल्याने महिलांसाठी या उत्सवाचे एक खास महत्त्व असते. नवरंगांचा हा उत्सव अधिक आनंददायी होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे ‘सकाळ’च्या वतीने ‘जागर आदिशक्तीचा नवरंग उत्सव’ साजरा होत आहे. 

पुणे - शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्याने वातावरण चैतन्यमय झाले आहे. हे उत्सव आपल्याला ऊर्जा देत असतात. नवरात्रोत्सव हा आदिशक्तीचा जागर असल्याने महिलांसाठी या उत्सवाचे एक खास महत्त्व असते. नवरंगांचा हा उत्सव अधिक आनंददायी होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे ‘सकाळ’च्या वतीने ‘जागर आदिशक्तीचा नवरंग उत्सव’ साजरा होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या महामारीमुळे आपण सर्वचजण ‘सोशल डिस्टंसिंग’चे पालन करीत असलो तरीही आपापल्या परीने आपण हे उत्सव साजरे करीत असतो. नवरात्रामध्ये घातल्या जाणाऱ्या कपड्यांच्या रंगांमध्ये कोणतीही धार्मिकता नसली तरी तो सांस्कृतिक उत्सव आहे. स्त्री-शक्तीचे दर्शन घडते. हाच उद्देश नवरात्रातील ‘नवरंगां’मध्ये आहे. ‘सकाळ’च्या या उपक्रमांतर्गत महिलांनी नऊ दिवस नऊ रंगांची वेशभूषा परिधान करायची आहे व ती छायाचित्रे खाली दिलेल्या ई-मेल आयडीवर व मोबाईल क्रमांकावर (व्हॉटसॅप) पाठवायची आहेत. यासाठी आजचा (रविवार) रंग केशरी (ऑरेंज) आहे. या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’ असून, सहप्रायोजक (पावर्डबाय) ‘सिलाई वर्ल्ड’ आहेत. छायाचित्र छापून येणाऱ्या महिलांना ‘सिलाई वर्ल्ड’कडून शॉपिंग व्हाउचर देण्यात येणार आहे. ते व्हाउचर महिलांनी ‘सिलाई वर्ल्ड’च्या जवळच्या दुकानात जाऊन घ्यावे. यासाठी छायाचित्र पाठविताना आपली माहिती देणे आवश्‍यक आहे.

चोरट्यांची 'छप्पर फाड के' चोरी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर मारला डल्ला

छायाचित्र पाठविण्यासाठी अटी 
1) छायाचित्रामध्ये चारपेक्षा जास्त महिलांचा समावेश असावा. सिंगल फोटो गृहीत धरले जाणार नाहीत. 
2) त्या दिवसाच्या रंगाचा (आजचा रंग केशरी) फोटो त्याच दिवशी दुपारी पाच वाजेपर्यंत पाठवावा. 
3) छायाचित्र पाठविताना सोबत ग्रुपचे नाव/कंपनीचे नाव/सोसायटीचे नाव, फोन नंबर देणे आवश्‍यक आहे. 
4) पुढच्या रंगाचे फोटो आधीच पाठविल्यास त्याला प्रसिद्धी दिली जाणार नाही.
5) छायाचित्र निवडण्याचे व नाकारण्याचे अंतिम अधिकार ‘सकाळ’ व्यवस्थापनाकडे असतील.

व्हॉट्‌सॲप क्रमांक : ७२१९६११३७४  
मेल आयडी : sakalpune2020@gmail.com

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratrotsav Celebration navrang sakal