esakal | चोरट्यांची 'छप्पर फाड के' चोरी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर मारला डल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Crime_Thief

कोरोनामुळे लागू केलेला लॉकडाऊन हळूहळू शिथील झाल्यानंतर शहरात चोरी, घरफोडीच्या घटना वाढल्या. विशेषतः कोरोनामुळे गावी गेलेल्या नागरीकांची घरे चोरट्यांकडून लक्ष्य करण्यात येत आहेत.

चोरट्यांची 'छप्पर फाड के' चोरी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर मारला डल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील घरफोडीच्या बहुतांश घटनांमध्ये चोरट्यांकडून दरवाजाचे कूलुप, कडी-कोयंडा तोडून किंवा खिडकीवाटे घरात प्रवेश करुन चोरी केल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत, पण कोंढव्यात झालेल्या एका घरफोडीच्या घटनेत चोरट्यांनी थेट 'छप्पर फाड के' चोरी केल्याचे उघड झाले. चोरट्यांनी घराचे छप्पर उचकटून घरात ठेवलेल्या रोख रकमेसह सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरुन नेला.

पुण्यात ऐन गर्दीच्या ठिकाणी थरार; शिवीगाळ केली म्हणून मित्रालाच चाकूने भोसकले​ 

कोरोनामुळे लागू केलेला लॉकडाऊन हळूहळू शिथील झाल्यानंतर शहरात चोरी, घरफोडीच्या घटना वाढल्या. विशेषतः कोरोनामुळे गावी गेलेल्या नागरीकांची घरे चोरट्यांकडून लक्ष्य करण्यात येत आहेत. चोरीच्या घटनांमध्ये बंद सदनिका, घरांच्या दरवाजांचे कुलूप, कडी-कोयंडा उचकटून चोरी करण्याची चोरट्यांची सर्वसाधारण गुन्हे पद्धती आहे. त्याचबरोबर काही सराईत चोरट्यांकडून खिडकीचे लोखंडी गज कापून घरात प्रवेश घेत चोरी केल्याच्याही काही घटना घडतात. परंतु कोंढवा येथे चोरट्यांनी थेट घराचे छप्पर उचकटून चोरी केल्याची घटना घडली आहे.

'फी'न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण रोखताय? शिक्षण विभागाचा शाळांना कडक इशारा 

कोंढव्यातील शिवनेरीनगर येथे राहणारे अनिलकुमार पांडे (वय 48) हे 13 ऑगस्ट ते 26 सप्टेंबर या कालावधीमध्ये ते घराला कुलूप लावून त्यांच्या मुळगावी उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे गेले होते. ते 27 सप्टेंबरला घरी परतले. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे छप्पर उचकटून घरात ठेवलेली पाच हजार रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक ए.के.चाऊस करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)