नायक-नायिका ते गायक-गायिका!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

‘सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच’च्या सभासद, वाचकांसाठी आज विनामूल्य प्रयोग

पुणे - मराठी नाट्य- चित्रसृष्टीत अभिनयाबरोबरच गाता गळा असलेल्या काही प्रसिद्ध कलावंतांना एकत्र आणून अविनाश-विश्वजीत सादर करीत असलेल्या ‘नायक-नायिका ते गायक-गायिका!’ कार्यक्रमाचा प्रयोग ‘सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच’चे सभासद, त्यांचे कुटुंबीय आणि ‘सकाळ’च्या वाचकांसाठी शनिवारी (ता. ४) सायंकाळी ६.३० वाजता म्हात्रे पूल परिसरातील शुभारंभ लॉन्स येथे होत आहे.

अभिनेते सुमीत राघवन, सीमा देशमुख, अजय पूरकर आणि रसिका सुनील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. अभिनेता पुष्कर श्रोत्री कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत. या गायक अभिनेत्यांच्या आयुष्यात गाणं आधी आलं की अभिनय, की अभिनय करता करता गाणं, अभिनय सोपा की गाणं.. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे रसिक श्रोत्यांना मिळणार आहेत. अविनाश विश्वजीत यांच्या अव्वल वादक संचाची या कलाकारांना साथ असणार आहे. कार्यक्रमाचे प्रायोजक ‘लोटस खाकरा शबरी खाकरा’, स्थळ प्रायोजक शुभारंभ लॉन्स आणि लकी ड्रॉ प्रायोजक सूर्यशिबिर रिसॉर्ट आहेत. 

सभासदांसाठी सूचना 
‘सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच’चे सभासद आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रवेशिकांसाठी सभासदांनी ओळखपत्र व माहिती पुस्तिकेतील आठव्या क्रमांकाची प्रवेशिका आणावी. 
नोंदणीसाठी *मोबाईल क्रमांक ९०७५०१११४२ वर सकाळी ११ ते सायंकाळी ६ 
 ७७२१९८४४४२ या व्हॉट्‌सॲप क्रमांकावरही नावनोंदणी करता येईल. 
‘सकाळ’च्या वाचकांनाही प्रवेश विनामूल्य मात्र प्रवेशिका आवश्‍यक. 
प्रवेशिका ‘सकाळ’ मुख्य कार्यालय, दुसरा मजला, ५९५, बुधवार पेठ येथे सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत उपलब्ध. 
अधिक माहितीसाठी ९०७५०१११४२

Web Title: nayak-nayika to gayak-gayika event