सहगल यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

पुणे - बंडखोर लेखिका, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खंदी पुरस्कर्ती अशी महिला यवतमाळ येथे अकरा जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन करणार आहे. तिचं नाव नयनतारा सहगल. या महिलेचं वय अवघं ९२ वर्षे. त्यांचं आडनाव सहगल असले, तरी त्या महाराष्ट्राच्या कन्या आहेत.

नयनतारा यांनी सर्व लिखाण हे इंग्रजीतून केले आहे. दहा कादंबऱ्या, कथासंग्रह यांसह नियतकालिके, वृत्तपत्रांसाठी देखील त्यांनी विपुल लिखाण केले. त्यांच्या लिखाणाची देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. दाभोलकरांसह विचारवंतांच्या हत्येचा निषेध म्हणून त्यांनी ‘पुरस्कारवापसी’ केली होती.

सहगल यांचे महाराष्ट्राशी नाते
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांची कन्या म्हणजे नयनतारा सहगल. ही त्यांची ओळख मानली जाते. त्यांना काश्‍मिरी आहे, असेही मानले गेले; पण त्यांना वडिलांकडून मराठी पार्श्‍वभूमी लाभली. त्यांचे वडील बॅरिस्टर रणजित सीताराम पंडित. ते कोकणातल्या सावंतवाडी संस्थानातील कुडाळजवळील बांबोलीचे. रणजित हे १९ व्या शतकातील संस्कृती आणि प्राचीन भारतीय साहित्याचे गाढे विद्वान होते. पुण्यातील हुजूरपागा शाळा स्थापनेत  सहभाग असलेले शंकर पंडित हे सहगल यांचे काका होते. मामेबहीण असलेल्या इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली, त्या वेळीदेखील त्यांच्या धोरणांना सहगल यांनी प्रखर विरोध केला होता. यामुळे त्यांना देण्यात आलेले भारतीय राजदूत पद रद्द करण्यात आले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन हे ज्ञानपीठ विजेत्या वा तेवढ्या उंचीच्या अमराठी लेखकाच्या हस्ते करावे, असा महामंडळाचा प्रयत्न असतो, म्हणूनच नयनतारा यांना आमंत्रित केले आहे.
- श्रीपाद जोशी, अध्यक्ष, साहित्य महामंडळ

नयनतारा यांचा महाराष्ट्राशी असलेला अनुबंध या निमित्ताने मराठी जनतेसमोर यावा, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा, हा हेतू समोर ठेवून त्यांना उद्‌घाटक म्हणून बोलावले आहे.
- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद

Web Title: Nayantara Sehgal Sahitya Sammelan