खंडाळा .नायगाव ग्रामपंचायत सदस्यत्व पदाचा देणार राजीनामा .

खंडाळा .नायगाव ग्रामपंचायत सदस्यत्व पदाचा देणार राजीनामा .
Published on

नायगावचे ग्रामपंचायत सदस्य देणार राजीनामा
खंडाळा, ता. ६ ः प्रस्तावित चौरेडिया इंडस्ट्रियल पार्क एलएलपीच्या प्रकल्पासाठी भूसंपादन होत असल्याच्या निषेधार्थ स्वातंत्र्यदिनी नायगावचे ग्रामपंचायत सदस्य सागर नेवसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले आहे.
सागर नेवसे यांनी म्हटले आहे, की नायगाव, सांगवी व धनगरवाडी येथील प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पासाठी नायगाव येथील ७४ गट, सांगवीतील १० व धनगरवाडीतील एका गटासह सुमारे १२५ एकर क्षेत्र संपादन प्रक्रियेत असून, जवळपास २०० ते २५० शेतकरी बाधित होत आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला. नायगाव येथे यापूर्वी सात प्रकल्पसाठी जमीन संपादित झालेले असताना, पुन्हा एका प्रकल्पासाठी जमीन संपादनाच्या निर्णयाला १५ ऑगस्टपर्यंत स्थगिती देण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात करण्यात येईल. नायगाव व सांगवी गावाने स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार व नायगाव ते खंडाळा बाईक रॅली काढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com