
मुंबई नंतर आता पुण्यात NCB ने छापेमारी केली आहे.
पुणे : मुंबई नंतर आता पुण्यात NCB ने छापेमारी केली आहे. काल शनिवारी ड्रग्स पेडलर चिंकू पठाणच्या पुण्यातील साथीदाराच्या घरावर हा छापा टाकण्यात आला. या छापेमारीमध्ये NCB च्या हाती महत्वाचे पुरावे मिळाल्याची माहिती आहे.
हिंदी चित्रपटातील हिरो आणि हिरोइन यांना ड्रग्स पुरवणाऱ्या चिंकू पठाण याच्या पुण्यातील सहकार्याच्या घरावर एनसीबीच्या पथकाने छापेमारी केली. राजू सोनावणे नावाच्या सप्लायरवर ही धाड टाकण्यात आली. मात्र राजू सोनावणे फरार झाला आहे. पुण्यातील खडक पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणार्या घरावर ही छापेमारी करण्यात आली. तसेच हडपसर आणि आणखी 3 ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या.
चिंकू पठाणचा साथीदार यावेळी फरार झाला असला तरी त्याच्या घरातून महत्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. त्याचे 3 मोठे गोडाऊन आहेत, जेथे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आहेत. मात्र NCB ने त्याचे गोडाऊन उद्ध्वस्त केले आहे. तसेच पुण्यातील चिकूंचे रॅकेट नेस्तनाबूत करण्यात आले आहे.
हेही वाचा - नऱ्हे : बेकायदा बांधकामांमुळे बकालपणात वाढ
पुण्यातून किराणा मालातून अंमली पदार्थांची तस्करी केली जायची, अशी माहिती मिळत आहे. अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात तपासादरम्यान ड्रग्स प्रकरणात चिंकू पठाण व फारूक बटाटा या दोघांची नावे समोर आली होती. त्यात ते बॉलिवूडला ड्रग्स पुरवत असल्याचे समोर आले होते. यानंतर या दोघांचा मुंबई एनसीबीकडून तपास सुरू आहे. चिंकू पठाण व फारूक बटाटा हे अटकेत आहेत. या तपासात मात्र चिंकू पठाण याचा पुण्यात एक सप्लायर आसल्याचे समजले होते. त्यानुसार आज मुंबईच्या पथकाने चिंकू पठाण याचा पुण्यातील सप्लायर असणाऱ्या एकाच्या घरावर छापा टाकला. पण तो फरार झाला आहे. पण पथकाला येथून महत्त्वाचा पुरावा मिळाले आहेत, असे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले. खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत तो राहत होता.