Republic Day : एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिराला सुरवात

आरडीसी उद्घाटन सोहळ्यात एनसीसीच्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही विंगमधून निवडलेल्या कॅडेट्सच्या तुकडीने संचलन केले.
ncc
nccsakal

पुणे - राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) प्रजासत्ताक दिन शिबिराचे (आरडीसी) उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते शनिवारी (ता. ७) संपन्न झाले. या ७४ व्या एनसीसी आरडीसीची सुरवात झाली असून महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात विविध राज्यातून आलेल्या एनसीसी संचालनालयातील एकूण दोन हजार १५५ कॅडेट्सचा सहभाग आहे.

आरडीसी उद्घाटन सोहळ्यात एनसीसीच्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही विंगमधून निवडलेल्या कॅडेट्सच्या तुकडीने संचलन केले. या संचलनाची पाहणी उपराष्ट्रपतींनी केली. या कार्यक्रमादरम्यान एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी उपराष्ट्रपतींना एनसीसीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्यत्व दिले.

यावेळी धनखड म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांमध्ये एनसीसीने प्रेरणादायी आणि शिस्तबद्ध तरुणांची एक चैतन्यशील आणि वैविध्यपूर्ण केडर तयार केली असून हे तरुण जीवनाच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहेत. एनसीसी ही सर्वात मोठी युवा संघटना असून स्वातंत्र्याच्या अमृतकाळात हे कॅडेट्स देशासाठी विशेष कामगिरी करतील.’’

आरडीसीमध्ये सर्व केंद्रशासित प्रदेश व राज्यातून संचालनालयांनी सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर युवा विनिमय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शिबिरात १९ मित्र देशांतील कॅडेट आणि अधिकारी देखील सहभागी आहेत. दरम्यान यासाठी एनसीसीचे महाराष्ट्र संचालनालय पुण्यातून २९ डिसेंबर २०२२ रोजी रवाना झाले होते. आरडीसीमध्ये सांस्कृतिक स्पर्धा, एकात्मता जागृती कार्यक्रम आणि विविध संस्थात्मक प्रशिक्षण स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धा होणार आहेत.

तसेच २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये निवडक कॅडेट्स सहभाग घेत आपापल्या संचालनालयाचे नेतृत्व करतील. तर २८ जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या रॅलीने आरडीसीचे समारोप होईल. या सर्व स्पर्धांच्या माध्यमातून एका संचालनालयाला विजेतेपदाचा मान मिळेल. गेल्या वर्षी महाराष्ट्र संचालनालयाने आरडीसीमध्ये प्रथम क्रमांक पटकावले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com